|
|
|
|
सुरेश खरे यांच्या नाट्यलेखानाचा प्रवास १९६६ पासून 'सागार माझा
प्राण' या नाटकानं सुरु झाला. त्यानंतर जवळजवळ चाळीस वर्षांच्या
कालावधीत त्यांनी लिहिलेली २९ नाटकं हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर
आली. ज्वलंत सामाजिक प्रश्न, स्त्रीची दुःखं, स्त्री-पुरुष संबंध
मानवी व्यवहार आणि गुंतागुंतीच्या मानसशास्त्रीय हाताळणी आणि वास्तववादी
वातावरण आणि पात्रं यामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या
नाटकांना भरभरुन दाद दिली.
|
|
सागर
माझा प्राण |
| |
|
|
'सागर माझा प्राण' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर १९६६ या दिवशी रात्री ७.३०
वाजता साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत - |
नंदकुमार रावते, विनायक जोशी, राजा बापट,
आशा कामेरकर, मनोरमा वागळे, भाऊ बिवलकर, हरीश पाठारे, रमेश
लऊळ, पप्पू रावते, परशुराम सराफ़, विनोद आचरेकर, सदाशिव क्षीरसागर.
निर्मिती: ललीत कला साधना, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य - प्रकाश योजना: बाबा पार्सेकर
संगीत: यशवंत देव
* सागर माझा प्राण या नाटकाला राज्य नाट्यस्पर्धेत प्रयोग,
दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना या विभागात पारितोषिकं मिळाली.
|
|
|
स्वर
जुळता गीत तुटे |
| |
|
स्वर जुळता गीत तुटे या नाटकाचा
शुभारंभाचा प्रयोग शनिवार दिनांक ११ फ़ेब्रुवारी १९६७ या दिवशी
रात्रौ ८.३० वाजता शिवाजी मंदिर मुंबई येथे करण्यात आला. त्यात
भाग घेणारे कलावंत: |
 |
मामा पेंडसे, भावना, विनायक जोशी,
लता जूकर, बेबी सुरेखा, वसंत खरे, दिनानाथ टाकळकर, एलिस रामराजकर,
रमेश होनावर, एस.महींद्र, एरन जोसेफ
निर्मिती: रंगरेखा, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाश योजना: बाबा पार्सेकर
संगीत: कुमारसेन गुप्ते
|
|
|
 |
'स्वर जुळता गीत तुटे' नाटकाचा पुनरज्जीवीत
प्रयोग नाट्यमंदार, मुंबई या संस्थेने 'देवाशपथ खरं सांगेन' या
नावानं केला. प्रमुख भूमिका - लालन सारंग.
|
 |
'स्वर जुळता गीत तुटे' या नाटकाचं
अनिल मेहता यांनी केलेलं गुजराती रुपांतर 'शमणा सुकाया भीना रुमालमां'
या नावानं गुजराथी रंगभूमीवर आलं. विष्णुकुमार व्यास दिग्दर्शित
या नाटकात जंखना देसाई, लक्ष्मी पटेल, विष्णुकुमार व्यास आणि विनोद
व्होरा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
|
|
काचेचा
चंद्र |
| |
|
'काचेचा चंद्र' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर १९६९ या दिवशी रात्रौ ८.३०
वाजाता साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
सुनीला प्रधान, नंदकुमार रावते,
अंजली मोने, रमेश होनावर, दत्ता मोने, विनायक जोशी, हरीश पाठारे,
छोटा लिमये, चंद्रकांत परुळेकर, प्रभा जोशी, गजानान भोसले, मनोहर
देशपांडे
निर्मिती: ललीत कला साधना, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाश योजना: बाबा पार्सेकर |
|
|
 |
व्यावसायिक रंगभूमीवर 'काचेचा चंद्र'
कलावैभवच्या मोहन तोंडवळकर यांनी खालील नटसंचात सादर केलं.
डॉ. श्रीराम लागू, भावना, तारा पाटकर, दिनानाथ लाड, कुंदा निरगुडकर,
नंदा फ़डके, शशिकांत महाडिक, सखाराम म्हात्रे, मोहन दळी, नरेन चव्हाण,
हिंदुराव पाटील, सुधाकर गंगोळी
|
 |
श्रीरंगसाधना, मुंबई या संस्थेनं
'काचेचा चंद्र' या नाटकाचा पुनरज्जीवित प्रयोग खालील नटसंचात सादर
केला. कानन कौशल, बाळ धुरी, माधव आचवळ, शुभांगी रावते, अविनाश खर्शीकर आणि इतर
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
 |
'काचनो चंद्र' या नावानं 'काचेचा
चंद्र' या नाट्काचं गुजराती रुपांतर अनिल मेहता यांनी केलं. गुजराथी
रंगभूमीवरच्या प्रयोगात सरिता, अरविंद जोशी, किशोर भट यांनी भूमिका
केल्या.
|
 |
'काचेचा चंद्र' या नाटकाचं हिंदी
रुपांतर 'कठपुतली' बंबई हिंदी विद्यापीठ या संस्थेने रंगमंचावर
आणलं. रमेश होनावर दिग्दर्शित या नटकांत नंदकुमार रावते, सुनीला
प्रधान, रमेश होनावर, सुरेश खरे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
|
|
मला
उत्तर हवंय |
| |
|
'मला उत्तर हवंय' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग बुधवार दिनांक २ डिसेंबर १९७० या दिवशी रात्री ८.३० वाजता
रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत |
 |
शशिकांत राजाध्यक्ष, उषा लिमये,
सुनीला प्रधान, दत्ता मोने, हरीश पाठारे, रंजना दिघे, सुरेश खरे,
रमेश होनावार, कुसुम नाईक, छोटा लिमये, अरुण कदम, अशोक देव, रमेश
लऊळ, परशुराम सराफ़, रंजना रावते, नयना रावते, रेखा कामत, प्रभा
पेठे आणि नंदकुमार रावते.
निर्मिती: ललीत कला साधना, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य: सखाराम भावे
प्रकाश योजना: बाबा पार्सेकर |
|
|
 |
'मला उत्तर हवंय' या नाटकाचा व्यावसायिक
रंगभूमीवर प्रथम प्रयोग कलावैभव, मुंबई या संस्थेतर्फ़े शनिवार
दिनांक ८ मे १९७१ या दिवशी रात्रौ ९.०० वाजता शिवाजी मंदिर येथे
खालील नटसंचात करण्यात आला.
अनंतराव वर्तक, उषा लिमये, विजया मेहता, दत्ता मोने, हरीश पाठारे,
कुंदा निरगुडकर, सुरेश खरे, प्रभाकर पाटणकर, शालिनी सावंत, सखाराम
म्हात्रे, मधुकर धाउसकर, अशोक देव, रंजना रावते, नयना रावते, लता
पंड्या, प्रभा पेठे, उषा गडकर, बाबा पार्सेकर, मोहन तोंडवळकर.
|
 |
'मला उत्तर हवंय' या नाटकाचं गुजराथी
रुपांतर ' साव रे अधुरुं मारुं आयखुं' कांति मडियाच्या दिग्दर्शनाखाली
'नाट्यसंपदा' या संस्थेनं सादर केलं.
|
 |
*'मला उत्तर हवंय' प्रथम महाराष्ट्र
नाट्यस्पर्धेत सादर करण्यात आलं. या स्पर्धेत 'मला उत्तर हवंय'
या नाटकानं प्रयोग, लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि प्रकाश योजना या
विभागांत पारितोषिकं पटकावली.
|
 |
** 'मला उत्तर हवंय' हे विजया मेहतांचं
पहिलं व्यावसायिक नाटक.
|
|
सखी
शेजारिणी |
| |
|
सखी शेजारिणी या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक ६ सप्टेंबर १९७० या दिवशी रात्रौ ८.३० वाजता
रविंद्र नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
शरद तळवळकर, पद्मा चव्हाण, मंगला
संझगिरी, सखाराम भावे, मधु आपटे, सखाराम म्हात्रे, कुमार अभिनय
निर्मिती: स्वरसंवाद, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाश योजना: सखाराम भावे
संगीत: हेमंत पंडित |
|
|
 |
'सखी शेजारिणी' या नाटकाचा पुनरज्जीवित
प्रयोग कलाकार, पुणे या संस्थेने खालील नटसंचात सादर केला. शरद तळवळकर, शलाका, श्रीमती देसाई आणि इतर
दिग्दर्शक: राजा नातू |
 |
सखी शेजारिणी या नाट्काचे हिंदी
रुपांतर 'देख पडोसन देख', बम्बई हिन्दी दिद्दापीठ या संस्थेने
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत रमेश होनावर यांच्या दिग्दर्शनाखाली
सादर करुन प्रयोग, दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या विभागात पारितोषिके
पटकावली. या प्रयोगात सुनीला प्रधान, रमेश होनावर, सुरेश खरे,
आशा गोगटे, राजा फोपे, छोटा लिमये आणि कुमार सुचेतन प्रधान यांनी
भूमिका केल्या.
|
 |
ओम कटारे यांच्या दिग्दर्शनाखाली
'सखी शेजारिणी'चे रुपांतर 'हाय पडोसन' या नावाने 'यात्री' या संस्थेने
सादर केलं.
|
 |
'सखी शेजारिणी'चे गुजराती रुपांतर
जगदीश शाह यांनी 'सरी जती सुंदरी' या नावाने केलं. किरण संपट निर्मित
गुजराती प्रयोगाचं दिग्दर्शन अरविंद जोशी यांनी केलं. आशुतोष शास्त्री
आणि जंखना देसाई यांनी प्रमुख भूमिका केल्या.
|
 |
'सखी शेजारिणी'चे सिंधी रुपांतर
'पाडेवारी' श्याम मेंघानी यांनी सादर केलं. |
|
पपा
सांगा कुणाचे |
| |
|
'पपा सांगा कुणाचे' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक १२ सप्टेंबर १९७१ या दिवशी रात्रौ ८.३० वाजता
साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत -
|
 |
डॉ. श्रीराम लागू, भावना, लता कर्नाटकी,
भक्ती बर्वे, राजा बापट, शशिकांत महाडिक, सबिहा मुराद, मोहन तोंडवळकर.
निर्मिती: कलावैभव, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य: छेल परेश
प्रकाश योजना : बाबा पार्सेकर |
|
|
 |
'पपा सांगा कुणाचे' या नाटकाचा पुनरज्जीवित
प्रयोग खालील नटसंचात करण्यात आला.
दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, नीना कुळकर्णी, सुषमा सावरकर,
देवेंद्र साळसकर आणि इतर.
निर्मिती: भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई
दिग्दर्शक: दिलीप कोल्हटकर
नेपथ्य, प्रकाश योजना: रघुवीर तळाशिकर |
 |
*'पपा सांगा कुणाचे' हे भक्ती बर्वेचं
व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक.
|
 |
'पपा सांगा कुणाचे' या नाटकाचं हिंदी
रुपांतर 'यात्री' या संस्थेने ओम कटारे यांच्या दिग्दर्शनाखाली
सादर केलं.
|
|
एका घरात होती |
| |
|
'एका घरात होती' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक १७ ऑक्टोबर १९७१ या दिवशी दुपारी ४.०० वाजता
रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत -
|
 |
विजया मेहता, श्रीकांत मोघे, प्रदिप
वेलणकर, दिलीप कुळकर्णी, दत्ता मोने, कुंदा निरगुडकर, पप्पू रावते
निर्मिती: कलावैभव, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाशयोजाना: बाबा पार्सेकर
संगीत: हेमंत पंडित |
|
|
 |
'एका घरात होती' हे प्रथम 'बिंदूत
हरवला सिंधु' या नावानं ललित कला साधना या सस्थेने रंगमंचावर आणलं
होतं. त्या प्रयोगात सुनंदा रावते, विनायक जोशी, रमेश होनावर,
सुरेश खरे, दत्ता मोने, रंजना दिघे, पप्पू रावते ह्या कलाकारांनी
भाग घेतला.
|
 |
*प्रदिप वेलणकर आणि दिलीप कुलकर्णी
यांनी 'एका घरात होती' या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण
केलं.
|
 |
'एका घरात होती' या नाटकाचं गुजराती
रुपांतर प्रा. मधुकर रांदेरिया यांनी 'अगनपथ' या नावानं केलं.
प्रा. मधुकर रांदेरियांनी दिग्दर्शित केलेल्या गुजराती प्रयोगात
पद्माराणी, प्रा. मधुकर रांदेरिया आणि राजेश जोशी यांच्या प्रमुख
भूमिका होत्या.
|
 |
एका घरात होती या नाटकाच्या कथेवर
आधारित 'दूरी' या हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली. राजदत्त यांचे
हिंदी चित्रपटाचे पहिले दिग्दर्शन. दूरी चित्रपटात शर्मिला टागोर,
मार्क झुवेर, विक्रम गोखले, यशवंत दत्त, रीमा यांच्या प्रमुख भूमिका
होत्या.
|
|
तूच
माझी राणी |
| |
|
'तूच माझी राणी' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार दिनांक २५
ऑक्टोबर १९७२ या दिवशी दुपारी ४.०० वाजता शिवाजी मंदिर, मुंबई
येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत : |
 |
सतीश दुभाषी, मंगला संझगिरी, पुष्पा
भोसले, सतीश रणदिवे, छोटू सावंत, इंदू लेले, रमेश पवार, मंदा देसाई,
शाम विश्वासराव, सदाशिव चव्हाण
निर्मिती: इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई
दिग्दर्शक: सतीश दुभाषी
नेपथ्य, प्रकाशयोजना: गौतम जोशी
संगीत: Shreekrishna Sahastrabuddhe
|
|
|
 |
'तूच माझी राणी' या नाटकाचा पुनरज्जीवित
प्रयोग पुण्याच्या रसिकराज या संस्थेने खालील नटसंचात केला
यशवंत दत्त, स्मिता ओक, प्रभाकर वाडेकर आणि इतर
दिग्दर्शक: भालचंद्र पानसे
नेपथ्य, प्रकाश योजना: बापू लिमये
संगीत: विलास अडकर
|
|
रक्त नको मज प्रेम हवे |
| |
|
सेटन नेव्हर स्लीवस या कादंबरीवर
आधारित 'रक्त नको मज प्रेम हवे' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
शुक्र्वार दिनांक २४ नोव्हेंबर १९७२ या दिवशी रात्री ९.३१ वाजता
शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत |
 |
मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर,
कमलाकर सोनट्क्के, सुहास जोशी, चंदू डेगवेकर, पंढरीनाथ बेर्डे,
आ. दे. पाटील, सुकुमार
निर्मिती: ललित कलादर्श
दिग्दर्शक: कमलाकर सोनटक्के
नेपथ्य, प्रकाशयोजना: विनायक चासकर
संगीत: भालचंद्र पेंढारकर |
|
|
 |
*'रक्त नको मज प्रेम हवे' हे नाटक
कमलाकर सोनटक्के यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील पहिलं दिग्दर्शन
आणि पहिली भूमिका. सुहास जोशी यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील पहिलं
नाटक आणि विनायक चासकर यांचं पहिलं नेपथ्य आणि पहिली प्रकाशयोजना.
|
 |
** संगीत दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर
यांनी या नाटकाच्या नांदीत चिनी सुरावटीचा उपयोग केला होता.
|
|
असूनी नाथ मी अनाथ |
| |
|
४ सप्टेंबर १९७३ या दिवशी सकाळी
१०.०० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
आशा पोतदार, विनायक जोशी, रमेश होनावर,
कुंदा निरगुडकर, राजा बापट, हरीश पाठारे, शशिकांत राजाध्यक्ष.
निर्मिती: ललीत कला साधना
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाशयोजना: बाबा पार्सेकर
संगीत: राजा देसाई |
|
|
 |
'असुनी नाथ मी अनाथ' चे गुजराथी
रुपांतर 'सळग्या सुरजमुखी' किरण संपत यांनी रंगभूमीवर आणलं. प्रविण
जोशी दिग्दर्शित गुजराती रुपांतर सरिता, अरविंद जोशी, किशोर भट,
जयंत व्यास यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
|
|
शततारका |
| |
|
'शततारका या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शुक्रवार दिनांक २६ एप्रिल १९७४ या दिवशी रात्रौ ८.३० वाजाता
शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे कलावंत:
|
 |
भावना, अविनाश मसुरेकर, शशिकांत
राजाध्यक्ष, सुधीर बावकर, हरीश पाठारे, कुंदा कान्हेरे, कुमुद
कर्णिक, अशोक देव, सुनिता पार्सेकर, दत्ता मोने, सुरेश खरे, स्नेहलता
खानविलकर, रामचंद्र कुळकर्णी, शिवराम येरागी, माधव धामणकर, सूर्यकांत
मोरे, लक्ष्मीकांत देशपांडे, दिनानाथ घारपुरे, प्रकाश फडतरे, रवींद्र
लघाटे.
निर्मिती: भूषण, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाशयोजना : बाबा पार्सेकर
संगीत: जयंत सहस्त्रबुध्दे |
|
|
 |
शततारकाचे गुजराती रुपांतर 'रस्ते
रझळती वार्ता' या नावानं कांति मडिया यांच्या दिग्दर्शनाखाली नाट्यसंपदा
या संस्थेने रंगभूमीवर आणलं.
|
|
आरोप |
| |
|
'आरोप' या नाट्काचा शुभारंभाचा प्रयोग
रविवार दिनांक २० मे १९७९ या दिवशी रात्रौ १०.३० वाजाता शिवाजी
मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.त्यात भाग घेणारे कलावंत - |
 |
जयराम हर्डीकर आणि लालन सारंग
निर्मिती: कलारंग, मुंबई
दिग्दर्शन आणि नेपथ्य: कमलाकर सारंग
प्रकाशयोजना: सुरेश गाडे
संगीत: अजित मर्चंट |
|
|
 |
८० प्रयोगांनंतर जयराम हर्डीकर यांची
भूमिका प्रभाकर पाटणकर यांना देण्यात आली.
|
 |
'आरोप' या नाटकाचा पुनरुज्जीवित
प्रयोग यशस्विनी पुणे या संस्थेने १९७७ साली केला. सुरेश खरे दिग्दर्शित
या प्रयोगात ज्योती चांदेकर आणि सुहास कुळकर्णी यांनी भूमिका केल्या.
नेपथ्य - आशिष भोळे, प्रकाशयोजना सुहास कुळकर्णी, संगीत - विश्वजीत
जोशी.
|
 |
२००६ साली आरोप या नाटकाचा नवीन
प्रयोग रंगमंचावर आला. दिग्दर्शक - श्रीकंत मोघे, कलाकार - मयूर
मोघे, विद्या कदम. नेपथ्य,प्रकाशयोजाना - बाबा पार्सेकर.
|
|
संकेत
मीलनाचा |
| |
|
संकेत मीलनाचा या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग गुरुवार दिनांक ८ एप्रिल १९८२ या दिवशी सायं. ७.०० वाजाता
रविंद्र नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत : |
 |
दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे
निर्मिती: इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई
दिग्दर्शक: प्रवीण जोशी
दिग्दर्शन सहाय्य: सरिता
नेपथ्य: विजय कपाडिया
प्रकाश योजना: गौतम जोशी
संगीत: किरण जगन |
|
|
 |
'संकेत मीलनचा' या नाटकाचं पुनरुज्जीवन
ही श्रींची इच्छा पुणे या संस्थेने केलं. कलाकार - विक्रम गोखले, स्वाती चिटणीस
निर्मिती: ही श्रींची इच्छा
दिग्दर्शक: सुरेश खरे
नेपथ्य: मोहन वाघ
प्रकाश योजना: सुरेश खरे
संगीत: अनंत अमेबल
|
 |
'संकेत मीलनाचा' या नाटकाच्या पुनरज्जीवित
प्रयोगाचे प्रसारण ईटीव्ही (मराठी) या वाहिनीने केले. तंत्र निर्देशन
- मंगेश कदम.
|
|
मंतरलेली
चैत्रवेल |
| |
|
'मंतरलेली चैत्रवेल' या नाटकाचा
शुभारंभाचा प्रयोग शनिवार दिनांक २२ डिसेंबर १९७९ या दिवशी रात्री
८.३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई येथे सादर करण्यात
आला.
त्यात भाग घेणारे कलावंत |
 |
दत्ता भट, जयराम हर्डीकर, दया डोंगरे,
शांता जोग, शशिकांत शिर्सेकर, मीनल जोशी.
निर्मिती: दी गोवा हिंदु असोसिएशन (कला विभाग)
दिग्दर्शक: अशोक साठे
नेपथ्य: द.ग. गोडसे.
Lightning: अशोक साठे
संगीत: प्रभाकर साठे |
|
|
 |
दूरदर्शनने मंतरलेली चैत्रवेल नाटकाची
दूरदर्शनसाठी निर्मिती करुन प्रसारण केले. अशोक साठे, दया डोंगरे,
शशिकांत शिर्सेकर, मेधा कुळकर्णी, मीना गोखले, अनिल दीक्षीत या
कलावंतांनी त्या भूमिका केल्या. दिग्दर्शन विनायक चासकर यांचे
होते.
|
|
वहिनीच्या बांगड्या |
| |
|
य.गो. जोशी यांच्या वहिनीच्या बंगड्या
या लोकप्रिय कथेवर आधारित वहिनीच्या बांगड्या या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत |
 |
कानन कौशल, अविनाश मसुरेकर, धुमाळ,
मनोरमा वागळे, लता जूकर, विजय गोखले
निर्मिती: श्री पटेल
दिग्दर्शक: पुरुषोत्तम दारव्हेकर
नेपथ्य, प्रकाशयोजना: पांडुरंग कोठारे
|
|
|
 |
*वहिनीच्या बांगड्या हे विजय गोखले
यांचे बालकलाकार म्हणून व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक.
|
|
वहिनीच्या बांगड्या |
| |
|
य.गो. जोशी यांच्या वहिनीच्या बंगड्या
या लोकप्रिय कथेवर आधारित वहिनीच्या बांगड्या या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत |
 |
कानन कौशल, अविनाश मसुरेकर, धुमाळ,
मनोरमा वागळे, लता जूकर, विजय गोखले
निर्मिती: श्री पटेल
दिग्दर्शक: पुरुषोत्तम दारव्हेकर
नेपथ्य, प्रकाशयोजना: पांडुरंग कोठारे
|
|
|
 |
*वहिनीच्या बांगड्या हे विजय गोखले
यांचे बालकलाकार म्हणून व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक.
|
|
मी एक विदूषक |
| |
|
मी एक विदूषक या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात
भाग घेणारे कलावंत: |
 |
शरद तळवळकर, सुमन धर्माधिकारी, सुषमा
पौडवाल, प्रवीण देवस्थळी, उदय पौडवाल आणि इतर
निर्मिती: नाट्य मंदार, मुंबई
दिग्दर्शक: मो. ग. रांगणेकर
नेपथ्य, प्रकाशयोजना: पांडुरंग कोठारे
|
|
|
|
संगम |
| |
|
संगम या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
सुकन्या कुलकर्णी, सुनील तावडे, मेधा
वागळे, सविता मालपेकर, जगन्नाथ कांदळगावकर, उपेन्द्र दाते आणि
इतर
निर्मिती: चंद्रलेखा, मुंबई
दिग्दर्शक: कुमार सोहनी
नेपथ्य, प्रकाशयोजना: मोहन वाघ
संगीत: अनंत अमेंबल |
|
|
|
कुणीतरी आहे तिथं |
| |
|
कुणीतरी आहे तिथं या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक २ जुलै १९८९ या दिवशी दुपारी ४.०० वाजता
गडकरी रंगायतन ठाणे येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
जयवंत वाडकर, सतीश रणदिवे, कुमार फ़ोडकर,
सतीश पुळेकर, सुहास पळशीकर, ज्योत्स्ना पडळकर, नीलिमा दामले, निशिगंधा
वाड, के. अरविंद, मिलींद गुरव
निर्मिती: रुपाली नाट्य विहार, मुंबई
दिग्दर्शन: कुमार सोहनी
नेपथ्य : मोहन शेडगे
प्रकाशयोजना: कुमार सोहनी
संगीत: अनिल मोहिले
|
|
|
 |
कुणीतरी आहे तिथं या नाट्काचा पुनरज्जीवित
प्रयोग ही श्रींची इच्छा या संस्थेने सादर केला. कलाकार:
सुहास कुळकर्णी, ज्योत्स्ना पडळकर आणि इतर
दिग्दर्शन, प्रकाशयोजना : सुरेश खरे
|
 |
*कुणीतरी आहे तिथं या नाटकावर अधारित 'एक रात्र मंतरलेली' या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. कलाकार: |
|
डॉ. श्रीराम लागू, निळू फ़ुले, आशुतोष
गोवारीकर, संजय मोने, प्रशांत दामले, अश्विनी भावे, जयवंत वाडकर,
आसावरी जोशी
निर्मिती: कुसो फिल्मस्
दिग्दर्शक: कुमार सोहनी
कथा, पटकथा, संवाद: सुरेश खरे
छायाचित्रण: सूर्यकांत लवंदे
संगीत: अनिल मोहिले
|
 |
*एक रात्र मंतरलेली - कुमार सोहनींचे
प्रथम चित्रपट दिग्दर्शन.
|
 |
** आशुतोष गोवारिकर यांची चित्रपटातील
पहिली भूमिका. |
|
अखेर
तू येशीलच |
| |
|
अखेर तू येशीलच या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शनिवार दिनांक २९ जुलै १९९ या दिवशी दुपारी ४.०० वाजाता
शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
रीमा, रमेश भाटकर, लीलाधर कांबळी,
विमल भातखंडे, राजन महाडिक, रामकृष्ण गाडगीळ, मेधा मटकर, सदाशिव
चव्हाण, माधवी गोगटे, ज्योती शेवडे, श्रीराम दाते, दिनकर गावडे,
शंकर गायकवाड.
निर्मिती: इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई
दिग्दर्शक: सुरेश राजदा
नेपथ्य: विजय कापडिया
प्रकाशयोजना: गौतम जोशी
संगीत: नंदलाल रेळे
|
|
|
|
ती वेळच तशी होती |
| |
|
ती वेळच तशी होती या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक ६ ऑगस्ट १९८९ या दिवशी सकाळी ११.०० वाजता
गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
अरुण जोगळेकर, भारती आचरेकर, विवेक
लागू, जान्हवई पणशीकर, सुषमा सावरकर, संदीप मेहता, दत्ता राणे.
निर्मिती: श्री चिंतामणी, मुंबई
दिग्दर्शन: राजन ताम्हाणे
नेपथ्य: रघुवीर तळाशिकर
प्रकाशयोजना: अंबर भोसले
संगीत: यशवंत देव
पार्श्वगायिका: आशा भोसले
|
|
|
 |
ती वेळच तशी होती या नाटकाची दूरदर्शनसाठी
निर्मिती करुन 'दूरदर्शनने' त्याचे प्रसारण केले.
|
|
तुला
हवंय तरी काय ? |
| |
|
तुला हवंय तरी काय? या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक २६ सप्टेंबर १९८९ या दिवशी दुपारी ४.०० वाजता
साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
यशवंत दत्त, आराधना देशपांडे, विनायक
जोशी, दिनेश करमरकर, शमा वैद्य , वसंत फ़डके, मानसी वढावकर
निर्मिती: नाट्यसंपदा, मुंबई
दिग्दर्शक: सुरेश खरे
नेपथ्य, प्रकाशयोजना: बाबा पार्सेकर
|
|
|
 |
तुला हवंय तरी काय? या नाटकाचं गुजरती
रुपांतर कांति मडियांच्या दिग्दर्शनाखाली नाट्यसंपदेनं आणलं.
|
|
तिची कथाच वेगळी |
| |
|
तिची कथाच वेगळी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार दिनांक २६ जुलै १९९३ या दिवशी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात
आला. त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
सविता प्रभुणे, स्मित तळवळकर, प्रदिप
वेलणकर, विनय आपटे, प्रभाकर गोखले.
निर्मिती: श्री चिंतामणी
दिग्दर्शक: विनय आपटे
नेपथ्य: मोहन शेडगे
प्रकाशयोजना: राजन ताम्हाणे
संगीत: अनंत अमेंबल
|
|
मालती
माधव आणि मंडळी |
| |
|
मालती माधव आणि मंडळी या नाटकाचा
शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर, मुंबई येथे खालील नटसंचात सादर
करण्यात आला. |
 |
दिलीप प्रभावळकर, दया डोंगरे, बाळ
कर्वे, रमाकांत देशपांडे, मनोरमा वागळे, सुरेश खरे
निर्मिती: पंचमवेद
दिग्दर्शन: सुरेश खरे
|
|
रामनगरी |
| |
|
राम नगरकर यांच्या 'रामनगरी' या
आत्मचरित्राचे नाट्यरुपांतर 'रामानगरी' या नाटकाचा शुभारंबाचा
प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
रामा नगरकर, सुहासिनी देशपांडे, नरेन
डोंगरे, अनिल भागवत
निर्मिती: पंचमवेद, मुंबई
रुपांतर, दिग्दर्शन: सुरेश खरे
|
|
मिश्किली |
| |
|
'मिश्किली'चा शुभारंभाचा प्रयोग
११ जुलै १९११ या दिवशी रात्री ९.३० वाजता भावे नाट्य मंदिर, सांगली
येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे कलावंत:
|
 |
सुरेश खरे, आशालाता, इला भाटे, सुधीर
गाडगीळ
निर्मिती: वेध, मुंबई
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
 |
*मिश्किली चे २५ प्रयोग अमेरिकेत
२५ निरनिराळ्या शहरात करण्यात आले. त्यात सुरेश खरे, स्मिता तळवळकर,
स्वरुप खोपकर आणि सुधीर गाडगीळ यांचा सहभाग होता.
|
 |
** 'मिश्किली च्या प्रयोगातून सुधीर
गाडगीळ यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. |
|
याला
म्हणायचं तरी काय? |
| |
|
याला म्हणायचं तरी काय? या नाटकाचा
शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत:
|
 |
नयना आपटे, सुरेश खरे, लीलाधर कांबळी,
रणजित मसुरेकर.
निर्मिती: रणजित मसुरेकर
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
|
अशी
माणसं अशा गंमती |
| |
|
शं. ना. नवरे यांच्या गाजलेल्या
शन्नाडे या स्तंभलेखावर आधरित नाट्यरुपांतर अशी माणसं अशा गमती
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग कर्नाटक संघ, मुंबई येथे खालील नटसंचात
झाला. |
 |
आशा काळे, सुरेश खरे, बाळ कर्वे,
जयंत सावरकर.
निर्मिती: सुरेख निर्मिती, मुंबई
रुपांतर, दिग्दर्शन: सुरेश खरे.
|
 |
अशी माणसं अशा गंमती या नाटकाच्या
पुनरज्जीवित प्रयोगात शकुंतला नरे, सुरेश खरे, अनंत मिराशी आणि
सुरेश ताम्हणे यांनी भूमिका केल्या.
|
|
गोष्ट
दोघांची |
| |
|
शं. ना. नवरे यांच्या वेगवेगळ्या
कथांचं नाट्यरुपांतर 'गोष्ट दोघांची. याचा शुभारंभाचा प्रयोग दादर
माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे सादर करण्यात आला. कलाकार: |
 |
सुनीला प्रधान आणि सुरेश खरे
निर्मित: सुरेख निर्मिती, मुंबई
रुपांतर, दिग्दर्शन: सुरेश खरे
|
|
मी
बबन प्रामाणिक |
| |
|
मी बबन प्रामाणिक या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक १५ ऑगस्ट २००४ या दिवशी सायं ५.०० वाजता
टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
विजय चव्हाण, नीलम र्शिके, प्रसाद
ओक, महेश कोकाटे, नारायण जाधव.
निर्मिती: शो मन, मुंबई दिग्दर्शन:
कुमार सोहनी
नेपथ्य: रघुवीर तळाशिलकर
प्रकाशयोजना: कुमार सोहनी
संगीत: अशोक पत्की |
|
सुरेश
खरेंच्या नाटकांचे दिग्दर्शक |
| |
|
सुरेश खरेंची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरील अनेक नामवंत दिग्दर्शकांनी
दिग्दर्शित केली. दिग्दर्शक नंदकुमार रावते यांनी एकुण नऊ नाटकं
दिग्दर्शित केली. मो. ग. रांगणेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या
दिग्दर्शनाचा लाभ त्यांच्या नाटकांना मिळाला. सतिश दुभाषी, कुमार
सोहनी, अशोक साठे यांच्यासारख्या नवीन पिढीच्या दिग्दर्शकांनीही
त्यांची नाटकं दिग्दर्शित केली.
|
|
| नंदकुमार रावते |
सागर माझा प्राण
स्वर जुळता गीत तुटे
काचेचा चंद्र
मला उत्तर हवंय
पपा सांगा कुणाचे
सखी शेजारिणी
एका घरात होती
असुनी नाथ मी अनाथ
शततारका
|
| कमलाकर सारंग |
आरोप |
| प्रवीण जोशी |
संकेत मीलनाचा |
| अशोक साठे |
मंतरलेली चैत्रवेल |
| पुरुषोत्तम दारव्हेकर |
वहिनीच्या बांगड्या |
| मो. ग. रांगणेकर |
मी एक विदूषक |
| कमलाकर सोनटक्के |
रक्त नको मज प्रेम हवे |
| सतीश दुभाषी |
तूच माझी राणी |
| राजन ताम्हाणे |
ती वेळच तशी होती |
| विनय आपटे |
तिची कथाच वेगळी |
| कुमार सोहनी |
संगम
कुणीतरी आहे तिथं
मी बबन प्रामाणिक |
| सुरेश राजदा |
अखेर तू येशीलच |
| दिलीप कोल्ह्टकर |
पपा सांगा कुणाचे (पुनरज्जीवित) |
| राजा नातू |
सखी शेजारिणी (पुनरज्जीवित) |
| श्रीकांत मोघे |
आरोप (पुनरज्जीवित) |
|
|
सुरेश
खरे यांच्या नाटकांतील प्रमुख कलावंत |
| |
|
सुरेश खरे यांच्या नाटकांतील विविध भूमिका तीन पिढ्यांतील नामवंत
कलावंतांनी रंगवल्या. विविधरंगी भूमिकांचं हे आव्हान अनेक प्रतिभावान
कलावंतांनी समर्थपणे पेललं.
|
|
| डॉ श्रीराम लागू | काचेचा चंद्र, पपा सांगा कुणाचे |
| मामा पेंडसे | स्वर जुळता गीत तुटे |
| सतीश दुभाषी | तूच माझी राणी |
| दत्ता भट | एका घरात होती, मंतरलेली चैत्रवेल |
| विक्रम गोखले | संकेत मीलनाचा |
| शरद तळवळकर | सखी शेजारिणी, मी एक विदूषक |
| मा. दत्ताराम | रक्त नको मज प्रेम हवे |
| भालचंद्र पेंढारकर | रक्त नको मज प्रेम हवे |
| श्रीकांत मोघे | एका घरात होती |
| यशवंत दत्त | तुला हवंय तरी काय?, तूच माझी राणी |
| दिलीप प्रभावळकर | पपा सांगा कुणाचे (पुनरुज्जीवित)
| | नंदकुमार रावते | काचेचा चंद्र, मला उत्तर हवंय, सागर माझा प्राण |
| विनायक जोशी | सागर माझा प्राण,स्वर जुळता गीत तुटे,
असुनी नाथ मी अनाथ, काचेचा चंद्र,
एका घरात होती, तुला हवंय तरी काय? |
| प्रदीप वेलणकर | एका घरात होती, तिची कथाच वेगळी |
| दिलीप कुळकर्णी | एका घरात होती |
| जयराम हर्डीकर | आरोप, मंतरलेली चैत्रवेल |
| अविनाश मसुरेकर | शततारका, असुनी नाथ मी अनाथ, वहिनीच्या
बांगड्या |
| धुमाळ | वहिनीच्या बांगड्या |
| कमलाकर सोनटक्के | रक्त नको मज प्रेम हवे |
| विजय चव्हाण | मी बबन प्रामाणिक |
| दत्ता मोने | काचेचा चंद्र, मला उत्तर हवंय, एका घरात होती,
शततारका |
| शशिकांत राजाध्यक्ष | मला उत्तर हवंय, असुनी नाथ मी अनाथ |
| राजा बापट | सागर माझा प्राण, पपा सांगा कुणाचे,
असुनी नाथ मी अनाथ |
| अरुण जोगळेकर | ती वेळच तशी होती |
| विवेक लागू | ती वेळच तशी होती |
| सतीश पुळेकर | कुणीतरी आहे तिथं |
| अशोक साठे | मंतरलेली चैत्रवेल |
| बाळ धुरी | काचेचा चंद्र (पुनरुज्जीवित) |
| अविनाश खर्शीकर | काचेचा चंद्र (पुनरुज्जीवित) |
| अनंत वर्तक | मला उत्तर हवंय |
| बबन प्रभु | सखी शेजारिणी |
| रमेश भाटकर | अखेर तू येशीलच |
| सुधीर जोशी | काचेचा चंद्र (पुनरुज्जीवित) |
| हरिश पाठारे | सागर माझा प्राण, काचेचा चंद्र, मला उत्तर हवंय,
असुनी नाथ मी अनाथ, शततारका |
| सुहास कुलकर्णी | आरोप, कुणीतरी आहे तिथं |
| दिनानाथ टाकळकर | स्वर जुळता गीत तुटे |
| सतीश रणदिवे | तूच माझी राणी, असुनी नाथ मी अनाथ |
| लीलाधर कांबळी | काचेचा चंद्र, याला म्हणायचं तरी काय |
| विनय आपटे | तिची कथाच वेगळी |
| शशिकांत शिर्सेकर | काचेचा चंद्र, मंतरलेली चैत्रवेल |
| अरुण सरनाईक | असुनी नाथ मी अनाथ (पुनरुज्जीवित) |
| बाळ कर्वे | मालती माधव आणि मंडळी,
अशी माणसं अशा गंमती |
| प्रसाद ओक | मी बबन प्रामाणिक |
| अनंत मिराशी | अशी माणसं अशा गंमती |
| सुरेश ताम्हाणे | अशी माणसं अशा गंमती |
| आत्माराम भेंडे | पपा सांगा कुणाचे |
| रमाकांत देशपांडे | मालती माधव आणि मंडळी |
| जयंत सावरकर | अशी माणसं अशा गंमती |
| रमेश पवार | तूच माझी राणी |
| सुनील तावडे | संगम |
| उपेंद्र दाते | संगम |
| जनन्नाथ कांदळगावकर | संगम |
| राम नगरकर | रामनगरी |
|
|
सुरेश
खरे यांच्या नाटकांतील प्रमुख
अभिनेत्री |
| |
|
|
|
| भावना | काचेचा
चंद्र, स्वर जुळता गीत तुटे, पपा सांगा कुणाचे, असुनी नाथ मी अनाथ, शततारका |
| विजया मेहता | मला उत्तर हवयं, एका घरात होती |
| मनोरमा वागळे |
सागर माझा प्राण, वहिनीच्या बांगड्या, मालती माधव आणि मंडळी |
| आशा पोतदार |
काचेचा चंद्र, असुनी नाथ मी अनाथ |
| लालन सारंग |
आरोप, देवाशपथ खरं सांगेन |
| सुहास जोशी | रक्त नको मज प्रेम हवे |
| दया डोंगरे |
संकेत मीलनाचा, मंतरलेली चैत्रवेल |
| नीना कुळकर्णी |
पपा सांगा कुणाचे (पुनरुज्जीवित)
|
| भारती आचरेकर |
पपा सांगा कुणाचे, ती वेळच तशी होती |
| शांता जोग |
मंतरलेली चैत्रवेल |
| मंगला संझगिरी |
सखी शेजारिणी, तूच माझी राणी |
| पद्मा चव्हाण |
सखी शेजारिणी |
| भक्ती बर्वे |
पपा सांगा कुणाचे |
| स्वाती चिटणीस |
संकेत मीलनाचा |
| निशिगंधा वाड |
कुणीतरी आहे तिथं |
| स्मिता तळवळकर | तिची कथाच वेगळी, काचेचा चंद्र, मिश्किली |
| सविता प्रभुणे |
तिची कथाच वेगळी
| | रीमा |
अखेर तू येशीलच |
| कानन कौशल |
वहिनीच्या बांगड्या |
| सुमन धर्माधीकारी |
मी एक विदूषक |
| ज्योती चांदेकर |
आरोप (पुनरुज्जीवित) |
| सुकन्या कुलकर्णी |
संगम |
| पुष्पा भोसले |
तूच माझी राणी |
| कुंदा कान्हेरे |
मला उत्तर हवंय,असुनी नाथ मी नाथ,शततारका, काचेचा चंद्र, एका घरात होती, पपा सांगा कुणाचे |
| सुनीला प्रधान |
काचेचा चंद्र, मला उत्तर हवंय, गोष्ट दोघांची, देख पडोसन देख |
| उषा लिमये |
मला उत्तर हवंय |
| लता कर्नाटकी |
पपा सांगा कुणाचे |
| आराधना देशपांडे |
तुला हवंय तरी काय? |
| आशालता |
मिश्किली |
| इला भाटे |
मिश्किली |
| नयना आपटे |
याला म्हणायचं तरी काय? |
| स्वरुप खोपकर |
मिश्किली |
| सविता मालपेकर |
संगम |
| मेधा जांबोटकर |
संगम |
| आशा कामेरकर |
सागर माझा प्राण |
| आशू |
असुनी नाथ मी अनाथ (पुनरुज्जीवित) |
| सुषमा सावरकर |
पपा सांगा कुणाचे (पुनरुज्जीवित), ती वेळच तशी होती |
| स्मिता ओक |
तूच माझी राणी (पुनरुज्जीवित) |
| सुहासिनी देशपांडे |
रामनगरी |
| नीलम शिर्के |
मी बबन प्रामाणिक |
| शकुंतला नरे |
अशी माणसं अशा गंमती |
|
|
सुरेश
खरे यांच्या नाटकांचे नेपथ्यकार |
| |
|
द.ग.गोडसे, रघुवीर तळाशिळकर, बाबा पार्सेकर, गौतम जोशी यांच्यासारख्या
अनुभवी नेपथ्यकारांनी अतिशय देखण्या पण वास्तववादी नेपथ्यानं लहानसहान
बारकाव्यांसकट सुरेश खरे यांची नाटकं सजवली.
|
|
| बाबा पार्सेकर | सागर माझा प्राण,
स्वर जुळता गीत तुटे,
असुनी नाथ मी अनाथ,
शततारका,
काचेचा चंद्र,
एका घरात होती,
तुला हवंय तरी काय |
| सखाराम भावे | मला उत्तर हवंय, सखी शेजारिणी |
| छेल परेश | पपा सांगा कुणाचे |
| विनायक चासकर | रक्त नको मज प्रेम हवे |
| कमलाकर सारंग | आरोप |
| मोहन शेडगे | कुणीतरी आहे तिथं,
तिची कथाच वेगळी |
| मोहन वाघ | संगम, संकेत मीलनाचा (पुनरुज्जीवित) |
| विजय कापडिया | अखेर तू येशीलच,
संकेत मीलनाचा |
| पांडुरंग कोठारे | वहिनीच्या बांगड्या,
मी एक विदूषक |
| द.ग.गोडसे | मंतरलेली चैत्रवेल |
| रघुवीर तळाशिकर | ती वेळच तशी होती,
मी बबन प्रामाणिक |
| गौतम जोशी | तूच माझी राणी |
| बापू लिमये | तूच माझी राणी (पुनरुज्जीवित) |
|
|
सुरेश
खरे यांच्या नाटकांचे नेपथ्यकार |
| |
|
|
|
| बाबा पार्सेकर | सागर माझा प्राण,
स्वर जुळता गीत तुटे,
मला उत्तर हवंय,
एका घरात होती,
असुनी नाथ मी अनाथ,
शततारका,
तुला हवयं तरी काय,
काचेचा चंद्र,
पपा सांगा कुणाचे |
| विनायाक चासकर | रक्त नको मज प्रेम हवे |
| सुरेश गाडे | आरोप |
| कुमार सोहनी | संगम,
कुणीतरी आहे तिथं,
मी बबन प्रामाणिक |
| अंबर भोसले | ती वेळच तशी होती |
| गौतम जोशी | संकेत मीलनाचा,
अखेर तू येशीलच,
तूच माझी राणी |
| अशोक साठे | मंतरलेली चैत्रवेल |
| पांडुरंग कोठारे | मी एक विदूषक, वहिनींच्या बांगड्या |
| राजन ताम्हणे | तिची कथाच वेगळी |
| बापू लिमये | तूच माझी राणी (पुनरुज्जीवित) |
|
|
सुरेश
खरे यांच्या नाटकांचे संगीत दिग्दर्शक |
| |
|
पार्श्वसंगीत हा नाटकाच्या प्रयोगाच्या परिणामकारकतेत भर घालणारा
महत्वाचा घटक. यशवंत देव, अनिल मोहिले, अशोक पत्की अशा प्रतिथयश
संगीतकारांनी सुरेश खरे यांच्या नाटकांना पार्श्वसंगीत दिलं.
|
|
| यशवंत देव |
सागर माझा प्राण,
ती वेळच तशी होती |
| हेमंत पंडित | एका घरात होती,
मला उत्तर हवय |
| भालचंद्र पेंढारकर | रक्त नको मज प्रेम हवे |
| अजित मर्चंट | आरोप |
| किरण जगन | संकेत मीलनाचा |
| अनिल मोहिले | कुणीतरी आहे तिथं |
| कुमारसेन गुप्ते | स्वर जुळता गीत तुटे |
| अनंत अमेंबल | संगम, तिची कथाच वेगळी |
| अशोक पत्की |
मी बबन प्रामाणिक |
| प्रभाकर साठे | मंतरलेली चैत्रवेल |
| विलास अडकर | तूच माझी राणी (पुनरुज्जीवित) |
| जयंत सहस्त्रबुद्धे | शततारका (संगीत संकलन) |
| राजा देसाई | असुनी नाथ मी अनाथ (संगीत संकलन) |
| नंदलाल रेळे | अखेर तू येशीलच(संगीत संकलन) |
| श्रीकृष्ण सहस्त्रबुद्धे |
तूच माझी राणी (संगीत संकलन) |
|
|
सुरेश खरेंच्या नाटकांची अन्य भाषांतील रुपांतरे |
| |
|
सुरेश खरेंच्या कही गाजलेल्या नाटकांचं अन्य भाषांत रुपांतर होऊन ती रंगभूमीवर आली.
त्यांत हिंदी, गुजराती, सिंधी, तामिळ आणि इंग्लीश या भाषांचा समावेश होता.
|
|
| गुजराती |
| १) स्वर जुळता गीत तुटे - शमणा सुकाया भोना रुमालमा |
| २) काचेचा चंद्र - काचनो चंद्र |
| ३) मला उत्तर हवंय - सावरे अधुरु मारु आयखु |
| ४) असुनी नाथ मी अनाथ - सळग्या सुरजमुखी |
| ५) शततारका - रस्ते रझळती वार्ता |
| ६) एका घरात होती - अगनपथ |
| ७) वहिनीच्या बांगड्या - अमे तो मीठा जळना मीन |
| ८) तुला हवय तरी काय? |
| ९) मंतरलेली चैत्रवेल |
| १०) सखी शेजारिणी - सरी जती सुंदरी |
| हिंदी |
| १) काचेचा चंद्र - कठपुतली |
| २) सखी शेजारिणी - देख पडोसन देख |
| ३) पपा सांगा कुणाचे |
| ४) आरोप - आरोप |
| ५) कुणीतरी आहे तिथं |
| इंग्रजी |
| असुनी नाथ मी अनाथ - The Deal |
| सिंधी |
| १) सखी शेजारिणी - पाडेवारी |
| २) पपा सांगा कुणाचे - पपा बोलो बोलो |
| तामिळ |
| १) काचेचा चंद्र |
| २) एका घरात होती |
|
|