|
|
|
रंगंमंचीय कार्यक्रम |
| |
|
मोठा रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत यांची आवश्यकता नसलेले पण तरीही नाटकाइतकेच आणि नाटकासारखेच हलकेफ़ुलके रंजक कार्यक्रम.
|
 |
१) मिश्किली
दूरदर्शनवरील लोकप्रिय 'गजरा' कार्यक्रमातील निवडक प्रसंगांची गुंफण असलेला रंजक कार्यक्रम
लेखक दिग्दर्शक:सुरेश खरे
कलाकार:सुरेश खरे, सुधीर गाडगीळ, इला भाटे, आशालता / स्मिता तळवळ्कर
|
 |
२) अशी माणसं अशा गंमती
शं. ना. नवरे यांच्या वृ पत्रातील शान्नाडे या स्तंभलेखनाचे नाट्यरुपांतर.
रुपांतर दिग्दर्शन: सुरेश खरे
कलाकार: आशा काळे / शकुंतला नरे, सुरेश खरे, अनंत मिराशी, सुरेश ताम्हणे.
|
 |
३) गोष्ट दोघांची
शं. ना. नवरे यांच्या पती - पत्नी संबंधांतील सहा निवडक कथांचं नाट्यरुपांतर
रुपांतर दिग्दर्शन: सुरेश खरे
कलाकार:सुनीला प्रधान, सुरेश खरे.
|
 |
४) पाउलखुणा
सुरेश खरे यांच्या नाट्यप्रवासाचा भरपूर रंजक असा एकपात्री कार्यक्रम
सादरकर्ते:सुरेश खरे
|
 |
५) या स्मृतींच्या गंधकोषी
काचेचा चंद्र, मला उत्तर हवंय, तूच माझी राणी, एका घरात होती, असुनी नाथ मी अनाथ, शततारका या नाटकांतीला नाट्यमय
सहभाग: स्मिता तळवळकर, सुरेश खरे.
|
 |
६) कथा अभिवाचन
गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, श्री. म. माटे, पु. भा. भावे, विजया राजाध्यक्ष, शंकर पाटील या कथाकारांच्या गाजलेल्या कथांचं अभिवाचन.
सहभाग:अजित भुरे, सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, स्मिता तळवळकर, इला भाटे, सुहास जोशी, सुरेश खरे.
|
 |
७) सांगण्यासारखं बरंच काही
सुरेश खरे यांच्या स्तंभलेखनावर आधारित एकपात्री कार्यक्रम.
सादरकर्ते: सुरेश खरे.
|
 |
*वरील सर्व कार्यक्रम प्रयोगासाठी उपलब्ध.
संपर्क: ९१-०२२-२४४५८५७७, ९१-०२२-२४४६४९९४, ९८२००-७८७६०
|
|
सुरेश खरे यांची संकल्पना आणि निवेदन असलेले संगीताचे कार्यक्रम |
| |
|
संगीतप्रेमी आणि रसिक अशा सुरेश खरे यांनी अनेक नाविन्यपूर्ण अशा संगीत कार्यक्रमांची संकल्पना आणि नियोजन करुन सादर केले. केवळ नाविन्यपूर्ण
संकल्पनांमुळे नाही तर अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्ण निवेदनांमुळे या कार्यक्रमांना लोकप्रियता मिळली.
|
 |
१) लख लख चंदेरी
'अयोध्येचा राजा' पासुन 'चौकट राजा' पर्यंतचा चित्रपट संगीताचा प्रवास आणि गाजलेली चित्रपट गीतं
संकल्पना, निवेदन: सुरेश खरे
संगीत नियोजक: कमलेश भडकमकर
गायक कलाकार: अजित परब, ह्रुषिकेश कामेरकर, शिल्पा पै आणि इतर.
|
 |
२) गाणी मनातली ... गळ्यातली
'रमला कुठे ग कान्हा,' 'मोहुनिया तुजसंगे', 'राधे तुझा सैल अंबाडा', 'नदी किनारी', 'सावळाच रंग तुझा' अशा अवीट गोडीच्या जुन्या गाजलेल्या भावगीतंची
मैफल.
संकल्पना, निवेदन:सुरेश खरे
निर्मिती: स्वरयश
गायक कलाकार:अजित परब, तनुजा जोग.
|
 |
३) शाकुंतल ते कटयार काळजात घुसली
नाट्यसंगीताच्या सुवर्णयुगातील निवडक नाटयगीतं
संकल्पना, निवेदन:सुरेश खरे
संगीत संयोजक:राजीव परांजपे
गायक कलाकार: तरुण पिढीचे प्रतिभावंत गायक.
|
 |
४) स्वर वसंत
डॉ वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत, चित्रपट संगीत या विविध गायकीचं दर्शन
संकल्पना, निवेदन: सुरेश खरे
गायक कलाकार: राहुल देशपांडे (वसंतराव देशपांडे यांचा नातू)
|
 |
* वरील सर्व कार्यक्रम प्रयोगासाठी उपलब्ध.
संपर्क: ९१-०२२-२४४५८५७७, ९१-०२२-२४४६४९९४, ९८२००-७८७६०
|
|
व्याख्याने |
| |
|
सुरेश खरेंनी मराठी रंगभूमीवरील आपल्या चाळीस वर्षाच्या अनुभावाचा आणि अभ्यासाचा उपयोग मराठी रंगभूमी आणि संबंधित कला या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने देउन केला. त्यांच्या व्याख्यानाचे महत्वाचे विषय म्हणजे:
|
 |
१) मराठी रंगभूमी काल, आज आणि उद्या
२) नाटक असं जन्माला येतं
३) सूत्रसंचालानाचे तंत्र
४) वाचन संस्कृती
५) कानेटकरांच्या नाटकांतील पिता-पुत्र संबंध
६) वि. वा. शिरवाडकरांची नाटकं.
|
|
|