|
|
आपल्या शालेय जीवनात सुरेश खरेंनी रंगमंचावर आपलं पहिलं पाऊल टाकलं.
नंतर तारुण्यात ललित कला साधना या हौशी नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांतून
कामं केली. त्यांच पहिलं नाटक 'सागर माझा प्राण.' १९६६ साली आणि
त्या पाठोपाठ १९६८ मध्ये काचेचा चंद्र रंगमंचावर आलं. त्यानंतर
मात्र लेखनावर लक्ष केंद्रित करुन स्वतःला अभिनय क्षेत्रापासून
शक्यतो दूर ठेवलं ते 'मिश्किली' या नाट्यविष्काराच्या निर्मितीपर्यंत. |
|