|
सुरेश खरे यांचे वेगवेगळ्या विषयांवरील अनेक लेख नियतकालिकांत
प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत रंगभूमीवरील कलाकार, नाटककार, प्रसारमाध्यमं,
बाल मानस शास्त्र, साप्ताहिक स्तंभलेखन अशा अनेक विषयांचा समावेश
आहे.
विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, नंद्कुमार रावते, मामा पेंडसे, राजन
जावळे, मो. ग. रांगणेकर यांच्यावर्ति त्यांचे लेख प्रकाशित झाले
आहेत. दूरदर्शन माध्यम, सूत्रसंचालनाचे तंत्र या विषयांवरही त्यांनी
अनेक लेख लिहिले. |
 |
| १९८९-९० या कालावधीत महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात
त्यांचे मिश्किली हे साप्ताहिक सदर येत असे. नाशिकच्या 'देशदूत'
आणि अहमदनगरच्या 'सार्वमत' या दैनिकांत ६५ आठवडे त्यांनी 'गजरा'
हे साप्तहिक सदर लिहिले. त्या सदरातील लेखांचा 'सांगण्यासारखं
.....' हा संग्रह प्रकाशित झाला आहे. |
|
अन्य लेखकांच्या विविध विषयांवरच्या पुस्तकांना सुरेश खरे यांच्या
प्रस्तावना लाभल्या आहेत. त्यांच्यातील रसिक अभ्यासकाचं दर्शन
या प्रस्तावनांतून होतं.
|
| शिर्षक | विषय | लेखक |
| चार एकांकिका |
एकांकिका संग्रह |
गजेंद्र कोरे |
| पाच एकांकिका | एकांकिका संग्रह | धनेश जूकर |
| तर्कातीत |
भयकथा संग्रह |
उर्मिला गद्रे |
| रंगतारका | मुलाखती | ज्योती कुंकळकर |
| नाट्यद्वयी |
मुलाखती |
डॉ. विश्वास मेहेंदळे |
| साक्षात्कार | कविता संग्रह | माधव सप्रे |
| नाट्याक्षरे |
समीक्षा |
डॉ. मधुरा कोरान्ने |
| Simple Yogic Kriyas | Yoga | Sadashiv Nimbalkar |
|
|